‘द ब्लू ट्रेल’ या चित्रपटाचा मागोवा घेत इफ्फीने 56 वा अध्याय केला सुरू
मला वाटते की दोन, तीन वर्षांमध्ये आपल्याकडे 1,00,000 लोक असतील आणि आपण लवकरच कान महोत्सवाइतके मोठे होऊ : शेखर कपूर


दर्पण न्यूज गोवा/पणजी इफ्फी (अभिजीत रांजणे)
गॅब्रिएल मस्कारोची डायस्टोपियन कथा ‘द ब्लू ट्रेल’, ज्याला त्याच्या मूळ पोर्तुगीजमध्ये ‘ओ उल्टीमो अझुल’ म्हणून ओळखले जाते, या चित्रपटाने आज 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोव्यात उद्घाटन झाले. उद्घाटन झालेल्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली ज्यामुळे लोकांमध्ये कौतुक आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, चित्रपटातील कलाकार आणि क्रू रेड कार्पेटवर उपस्थित होते ज्यात मारिया अलेजांड्रा रोजास, आर्टुरो सालाझार आरबी, क्लॅरिसा पिनहेरो, रोसा मालागुएटा आणि गॅब्रिएल मस्कारो यांचा समावेश होता. माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; इफ्फी महोत्सवाचे संचालक शेखर कपूर आणि दिग्गज अभिनेते नंदमुरी बालकृष्ण हे संवाद सत्रात उपस्थित होते.
चित्रपटाबद्दल भाष्य करताना शेखर कपूर म्हणाले, “मी बर्लिन चित्रपट महोत्सवात हा उद्घाटनाचा चित्रपट पाहिला जिथे त्याने सिल्व्हर बियर पुरस्कार पटकावला , जो दुसरा सर्वोत्तम पुरस्कार आहे. हा एक अतिशय भावनिक चित्रपट आहे, परंतु मला वाटते दिग्दर्शकाने याबद्दल अधिक सांगावे.” गॅब्रिएल मस्कारो म्हणाले, “हा चित्रपट त्या वृद्ध महिलेबद्दल आहे जी जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी नेहमीच वेळ असते हे समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करेल.” कपूर यांनीही इफ्फीप्रति आशा व्यक्त केली आणि म्हणाले, “मला वाटते की दोन-तीन वर्षांत आपल्याकडे 100,000 लोक असतील आणि आपण लवकरच कान महोत्सवाइतके मोठे होऊ.”
‘द ब्लू ट्रेल’च्या प्रीमियरचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. जीवनातील परीक्षांचा मनापासून घेतलेला शोध, लवचिकतेचा शांत उत्सव आणि तेरेसाच्या धाडसी आत्म-शोधाच्या तेजस्वी प्रवासाबद्दल प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले.
एक डायस्टोपियन नाट्य:
ब्राझीलच्या डिस्टोपियनच्या भयावह पार्श्वभूमीवर, ‘द ब्लू ट्रेल’ ही तेरेसा नावाच्या 77 वर्षीय उत्साही महिलेची कथा आहे जी नशिबाचा कठोर फेरा आणि तिला एका वृद्धाश्रमात बंदिस्त करण्याच्या सरकारच्या दबावाला आव्हान देते. स्वप्नांनी भरलेले हृदय आणि असीम भावना घेऊन, ती पहिल्यांदाच आकाशाचा अनुभव घेण्याची आणि भरारी घेण्याची आकांक्षा बाळगून अॅमेझॉनमधून एका धाडसी प्रवासाला निघते. सामान्य मार्गांनी प्रवेश नाकारला गेल्याने, ती बोटीने निघते , जिथे वाटेत तिला जिवंत पात्रे भेटतात, तिच्या धैर्याची आणि आश्चर्याची परीक्षा घेणाऱ्या आव्हानांना तोंड देते. प्रत्येक वळण, अडखळण आणि जादूच्या क्षणभंगुर क्षणांमधून, तेरेसाचा प्रवास स्वातंत्र्य, लवचिकता आणि समाजाने वयासाठी ठरवलेल्या सीमांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याच्या अदम्य आनंदाचा दाखला बनतो.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.



