महाराष्ट्र
जन सुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते मालगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीच्या नाम फलकाचे उद्घाटन

दर्पण न्यूज मिरज :-
जनतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जन सुराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते मिरज मालगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीच्या नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्थानिक लोकांना सर्व सहकार्य करू ,असे आश्वासन समित दादा कदम यांनी दिले.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक महादेव अण्णा कुरणे, सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रवीण धेंडे , दलित पॅंथर सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जमदाडे , अवधूत जगदाळे, कॉलनी मधील साहिल जमदाडे, मंदार दोडवाड, शरद जमदाडे ,मोहन सातपुते आदी नागरिक उपस्थित होते.