महाराष्ट्र
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सांगलीत स्वयंरोजगार मेळावा संपन्न

दर्पण न्यूज सांगली, : जिल्हा उद्योग केंद्र सांगली व टेलर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगार मेळावा उद्योग भवन सभागृह येथे संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम चालू करणे तसेच व्यवसाय वाढीसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास टेलर असोसिएशनचे बसवराज पाटील, शहाबाद जारे, शशिकांत कोपर्डे यांच्यासह टेलर वेल्फेअर असोसिएशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी सर्वांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत इच्छुकांचे अर्ज जिल्हा उद्योग केंद्रातर्फे निःशुल्क भरून घेण्यात आले.