शिवजयंती निमित्त समतानगर येथे पेन, वही, खाऊ वाटप चांगला कार्यक्रम:सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे*
*शिवजयंती निमित्त समता नगर मध्ये पेन वही खाऊ वाटपाचं स्तुत्य कार्यक्रम:सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे*
दर्पण न्यूज मिरज :- मिरज येथे समता नगर भागात शिवजयंती सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळून उत्साहात साजरी केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व प्रमुख उपस्थिती भीम आर्मीचे जैलाब शेख होते
जयंतीनिमित्त लहान मुला मुलींना वही पेन शालेय साहित्य गोड पदार्थ जिलेबी व चॉकलेटचे वाटप प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी संदीप शिंदे साहेब म्हणाले की शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे.कायद्याचे पालन करून पोलिसांना मदत करून शिवजयंती साजरी करावी असे संबोधले
यावेळी जैलाब शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते महिला पासून लेकरा पर्यंत शेतकरी ते शेतमजूर व शेतीचा पिकांची काळजी घेणारे व रयतेचे हित जपणारे कोणावरही अन्याय अत्याचार होऊ न देणारे न्यायप्रिय,बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्यकारभार करणारे रयतेच्या हितासाठी सर्वस्वी त्याग करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे यावेळी जैलाब शेख म्हणाले
या कार्यक्रमाची नियोजन व आभार विजय बल्लारी यांनी मानले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग खरात,सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी,सचिन शिरसाठ,पप्पू कोळेकर सतीश पावशे,संभाजी मामा कांबळे,बसू जडगे,राकेश कांबळे, गोकुळ गवारे व हनमंत कांबळे सहित भागातील नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते