पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.35 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना जिल्हास्तरीय समिती बैठकीस उपस्थिती. सकाळी 9.50 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून राम मंदिर कॉर्नर सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता आगमन व सांगली ग्रंथोत्सव-2024 च्या उदघाटन समारंभास उपस्थिती, स्थळ – कच्छी जैन भवन, 181, राम मंदिर कॉर्नर, सांगली. सकाळी 10.50 वाजता कच्छी जैन भवन येथून सांगली-मिरज-कुपवाड शहर मनपाकडे प्रयाण. सकाळी 10.55 वाजता आगमन व सांगली-मिरज-कुपवाड शहर मनपा येथे भेट, स्थळ – सांगली मिरज कुपवाड शहर मनपा, राजवाडा चौक, सांगली. सकाळी 11.50 वाजता सांगली मिरज कुपवाड शहर मनपा येथून कॉलेज कॉर्नर माधवनगर रोड सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता आगमन व केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 बाबत वार्तालाप कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – हॉटेल स्काय ॲव्हेन्यु, कॉलेज कॉर्नर, माधवनगर रोड, सांगली. दुपारी 12.45 वाजता हॉटेल स्काय ॲव्हेन्यु येथून म्हैसाळ ता. मिरजकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता आगमन व म्हैसाळ येथील मराठा समाज भवनाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – ग्रामपंचायत कार्यालय म्हैसाळ. दुपारी 2.15 वाजता श्री. दिपकबाबा शिंदे यांच्या निवासस्थानी राखीव, स्थळ – म्हैसाळ. सोयीनुसार म्हैसाळ येथून कोल्हापूरकडे प्रयाण.