संस्कारक्षम समाजाच्या निर्मितीसाठी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी; ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख
ब्रह्मानंदनगर येथे स्वामी रामानंद भारती व्याख्यानमाला उत्साहात
भिलवडी :
पोटाची भूक भागत नसेल,संगत व योग्य संस्कार नसतील तर माणूस आणि समाज अधोगतीला जातो.संस्कारक्षम समाजाच्या निर्मितीसाठी संस्कारक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी प्रत्येक,माता पित्याची असून ती कर्तव्य म्हणून पार पाडा असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व जेष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख यांनी केले.स्वामी रामानंद भारती विचारमंच ब्रह्मानंदनगर ता.पलूस यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत आई या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे होते.
रामलीला पार्टीच्या मध्यामातून नाट्य व लोककला जपणारे जेष्ठ कलाकार विश्वनाथ जाधव,शिवाजी जाधव,राजाराम जाधव,यशवंत जाधव,अशोक जाधव,अशोक साळुंखे,उत्तम साळुंखे यांचा इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल ऋतुजा मानुगडे,विक्रीकर निरीक्षक पदी निवड झालेबद्दल पूनम मानुगडे यांचा अभिंदनपर सत्कार करण्यात आला.
यापुढे बोलताना इंद्रजीत देशमुख म्हणाले की, स्वार्थाने बरबटलेले राजकारण,वाढती व्यसनाधीनता, टी. व्ही.मोबाईलच्या आहारी गेलेली तरुणपिढी
समाजिक,भावनिक स्वास्थ्य बिघडवित आहे.घराघरात छत्रपती शिवराय घडवायचे असतील तर आई जिजाऊसारखी कर्तबगार व कणखर असायला हवी.पुन्हा एकदा संत महात्मे आणि महापुरुषांच्या संस्कार आचरणात आणल्यास निश्चित सामाजिक क्रांती घडेल.ब्रह्मानंदनगर मधील युवकांनी जेष्ठ रंगकर्मींचा गौरव करू न नवा आदर्शवाद निर्माण केला आहे.जिथे घरातील वडीलधाऱ्यांचा सन्मान होतो त्या गावात संस्कारक्षम युवकांची पिढी घडली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व स्वागत विश्ववराज जाधव,स्वागत सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव यांनी केले.कु.गौरी हवालदार यांनी मानपत्राचे वाचन केले.सूत्रसंचालन विद्या मोहिते यांनी केले.तर आभार प्रदीप हवलदार यांनी मानले.
यावेळी साहित्यिक विजय जाधव,द्राक्षगुरू वसंतराव माळी,प्रा.जी.एस.साळुंखे,
आकाशवाणीचे निवृत्त प्रसारण अधिकारी संजय पाटील,हिम्मत पाटील,रमजान मुल्ला,शरद जाधव,अर्जुन जाधव,बाळासो जाधव,राजेश चव्हाण,पोलीस पाटील मनोज कोळेकर,शिवाजी तावदर आदी उपस्थित होते.रामानंद भारती विचारमंचचे
अध्यक्ष अभिजीत जाधव,उपाध्यक्ष विकास हवलदार,संदिप खुबीकर,दिगंबर माने,अनुप तावदर,शिवसागर कोकाटे आदींनी व्याख्यानमालेचे नेटके संयोजन केले.