दुधोंडी येथे आरपीआय जनसंपर्क कार्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
दुधोंडी :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आरपीआय चे पलुस कडेगांव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे यांच्या हस्ते करण्यात आले.पुष्पहार मुस्लिम आघाडीचे नेते रमजान मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुंडल पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. रिपब्लिकन पक्षाचे व भीमशक्ती ग्रुपचे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आरपीआयची विशाल तिरमारे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत देशातील तमाम बहुजनांचे उद्धारकर्ते आहेत.त्याच्यामुळेच या भारत देशाला नवीन दिशा मिळाली. शोषित पीडित दीनदलितांना बाबासाहेबांच्या मुळे न्याय मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे या देशातील सर्व समाजातील घटक गुण्यागोविंदाने राहत आहेत स्वतःची व आपल्या समाजाची प्रगती करीत आहे सहा डिसेंबर हा दिवस सर्व दलित बहुजन समाजासाठी दुःखाचा दिवस आहे या दिवशी तमाम शोषितांचा तारणहारता या जगाला दिनदलीतांना सोडून गेला. हा दिवस म्हणजे भारत देशातील नागरिकांसाठी दुःखाचा दिवस आहे.
यावेळी आरपीआयचे विशाल तिरमारे,रमजान मुजावर, भिमशक्ती ग्रुपचे अक्षय तिरमारे, वैभव तिरमारे, अजिंक्य तिरमारे, अक्षय कुमार प्रभाकर तिरमारे, ओम तीरमारे, कुणाल तिरमारे, रोहित तिरमारे, दिपराज तिरमारे, यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.