गंडवणारं, फसवीणारं महायुतीचं सरकार : डॉ विश्वजीत कदम
डॉ विश्वजीत कदम यांचा नागठाणे, अंकलखोप गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद ; जल्लोष अन् उत्स्फूर्त स्वागत

भिलवडी : या देशातील नागरिकांना भाजप सरकारने देशोधडीला लावले आहे, प्रत्येक वेळी नवीन आश्वासने देत असतात, पण ते पूर्ण करीत नाहीत, हे गंडवणारे, फसवणुकीचे महायुतीचे सरकार आहे , अशी टीका पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागठाणे व अंकलखोप गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले, स्व पतंगराव कदम साहेब यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास वर्षांपासून प्रयत्न केले. सामान्य माणसाच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापन केली. तसेच सामान्य जनतेला वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी भारतीय हॉस्पिटल ची स्थापना केली. अशा विविध माध्यमातून स्वर्गीय पतंगरावजी कदम यांनी महाराष्ट्राला नव्हेच तर देशासमोर एक आदर्श ठेवला .या आदर्शचा वारसा जपत मी आज रोजी पलूस कडेगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करीत आहे. जनतेचे हित माझे हित म्हणून मी काम करत आहे. यापुढेही विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन डॉक्टर विश्वजीत कदम यांनी केले.
अंकलखोप येथे कुंडलचे नेते किरण तात्या लाड, शिवसेनेचे पलुस कडेगाव तालुक्याचे पदाधिकारी मोहिते,पलूस तालुक्याचे पदाधिकारी शिंदे, तर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नागठाणे आणि अंकलखोप येथील कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन्ही गावांमध्ये लोकांचा उत्साह अतिशय होता.