महाराष्ट्र

कोल्हापूरात दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अटकेविरोधात ‘आप’ची निदर्शने

 

 

कोल्हापूरःअनिल पाटील

दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय ने कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली. या अटकेचे पडसाद कोल्हापुरात उमटले. येथील आम आदमी पार्टीच्या वतीने छ. शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली.

अटकेचा निषेध करण्यासाठी ‘आप’ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. “सर्वोत्कृष्ट शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा धिक्कार असो”, “खोट्या आरोपांखाली अटक करणाऱ्या सीबीआय चा धिक्कार असो”, “दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो”, “जेल के ताले तुटेंगे, मनीष सिसोदिया छुटेंगे” अशा घोषणा लागवल्या गेल्या.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. खोट्या आरोपांमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, अमरजा पाटील, संजय साळोखे, दुष्यंत माने, विजय हेगडे, राकेश गायकवाड, प्रथमेश सूर्यवंशी, समीर लतीफ, मयूर भोसले, विलास पंदारे, डॉ. उषा पाटील, रवींद्र राऊत, अमरसिंह दळवी, बसवराज हदीमणी, उषा वडर, लाला बिरजे, मंगेश मोहिते, बबन भालेराव, सदाशिव कोकितकर, भाग्यवंत डाफळे, पल्लवी पाटील, डॉ. सुरेश पाटील, संजय सूर्यवंशी, दत्तात्रय शिंदे, डॉ. कुमाजी, आदित्य पोवार, नाजील शेख, किशोर खाडे, साद शिलेदार, रणजित पाटील, तेजस चव्हाण, आनंदा सकटे, शकील मोमीन आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!