क्राईममहाराष्ट्र
राधानगरी तालुक्यातील नरतवङे येथे अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी श्रीपती भोसले यांना अटक
कोल्हापूरःअनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील नरतवङे येथील एका खासगी क्लासेसमध्ये 9 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीपती रामचंद्र भोसले वय 73 याला राधानगरी पोलिसांनी आज अटक केली आहे.
आरोपीने पिङीत मूलगीस एकटीला बोलवून तिला जवळ घेवून मिठी मारून तिच्या छातीला व पोटाला हात लावून तिचे मूके घेवून तिला याबाबत कोणाला सांगितले तर तूला शप्पथ आहे’ तूझे आजोबा आजी भाऊ तूझे आई वङील असे सर्व घरातील मरतील अशी धमकी दिली होती. या घटनेची फिर्याद राधानगरी पोलिसात दिल्याने त्यांच्यावर गून्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि. प्रणाली पोवार करत आहेत