दुधोंडी येथे कृष्णाकाठ उद्योग समुहाच्या वतीने रेल्वे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी मान्यवरांचा सन्मान
पलूस : दुधोंडी येथे कृष्णाकाठ उद्योग समुहास श्री विक्रांत शर्माजी रेल्वे अधिकारी, मा श्री प्रशांत कांबळे रेल्वे अधिकारी पुणे विभाग व श्री महेश अंबी वन अधिकारी विटा यांनी भेट दिली, यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाच्या वतीने त्यांचा सन्मानही करण्यात आला.
यावेळी विनायक शेठ माने उद्योजक सागर पाटील या सर्वांचा कृष्णाकाठ उद्योग समुहाचे संस्थापक व लोकनेते मा. जे के (बापू) जाधव व मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव यांच्या शुभ हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला, यावेळी मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी (भाऊ) जाधव, कृषिभूषण सुरेश (नाना) चव्हाण, संजय भोसले (सर), संभाजी धनवडे सचिन चव्हाण (सर) व इतर मान्यवर उपस्थित होते. नेहमीच लोकनेते जे के बापू जाधव आपुलकी तून लोकांचा सन्मान करतात. यावेळी ही कृष्णाकाठ उद्योग समूहाला भेट दिल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच सत्कार करण्यात आला.