





कडेगांव: कामगारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी कडेगाव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरात उभारलेल्या माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकास भेट दिली.
यावेळी माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी कै डॉ पतंगराव कदम साहेबांच्या कार्यास उजाळा दिला व विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी माजी आमदार मोहनरावदादा कदम, मा. शांतारामबापू कदम, लोकनेते जे के बापू जाधव, मा.सुरेशबापू आवटी तसेच कारखान्याचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.