मौजे दुधोंडी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि अधिकारी कार्यालय पलूस यांच्या शंखी गोगलगाय नियंत्रण मार्गदर्शन चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद
पलूस:; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील मौजे दुधोंडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी कार्यालय पलूस यांच्यामार्फत शंखी गोगलगाय नियंत्रण याविषयी मार्गदर्शन चर्चासत्र उत्साहात झाले.या कार्यक्रमात सौ पुष्पा साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
पुष्पा साळुंखे यांनी शंकी गोगलगाय नियंत्रण याबाबत माहिती दिली.पावसाळा हंगामात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत गोगलगाय सोयाबीन, भाजीपाला, पपई ,केळी, ऊस रोपटकेतील रोपे नवीन पाने फुले, कंद यांना छिद्र करतात तसेच बियांपासून अंकुरित कोवळे कोंब यांना कुरतडून खातात ,यामुळे उपद्रव होऊन कुरतडत असलेल्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होतो तसेच लहान रोपे मरतात.
शंखी गोगलगाय आफ्रिकन जायंट स्नेल या नावाने परिचित असून ती निरनिराळ्या पाचशे वनस्पतींना खाऊन जगते. ही कीड दिवसा दगड पालापाचोल्याळ्याच्या खाली झाडाच्या खोडाभोवती दाट गवतात ठिकाणी लपते. रात्रीच्या वेळी सक्रिय होऊन पिकाचे नुकसान करते.
पूर्ण वाढ झालेल्या शंखी गोगलगाय ची लांबी पंधरा ते साडे सतरा सेंटीमीटर असते अंडी गोलाकृती व पांढऱ्या रंगाची शाबुदाण्यासारखी असतात. सर्व गोलगाय बहुलिंगी असून त्या अंडी देण्यास सक्षम असतात. एक गोगलगाय सरासरी शंभर ते दीडशे अंडी देते. एक मादी वर्षातून सहा वेळा अंडी देते. सर्वसाधारण 17 दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात त्याची वाढ होण्यास आठ महिने ते एक वर्ष कालावधी लागतो. शंखि गोगलगाय अति थंड किंवा अति उष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुदऱ्याने बंद करून सुप्तावस्थेत जातात.
प्रसार –
या किडीचा प्रसार शेतामध्ये वापरात असणारी अवजारे, यंत्रसामग्री, शेणखत, वाळू, विटा, बेणे, रोपे, कलमे, इत्यादी मार्फत होतो गोगलगाय सर्वसाधारणपणे अन्न पाण्याशिवाय चार ते सहा महिने जिवंत राहू शकतात.
*गोगलगाय नियंत्रण उपायोजना*
सामूहिक मशागतीचे नियंत्रण
१) उन्हाळ्यात खोल नांगरट करावी
२) अंडी गोळा करून नष्ट करावीत
३) शेतावरील बांध स्वच्छ ठेवावेत
४) शेताभोवती दोन मीटर पट्ट्यात राख मोरचूद व चुना यांचे मिश्रण पसरवावे
५) शेतात सात ते दहा मीटर वर वाळलेले गवत, पपईचा पाला, गोणपाट इत्यादी ढीग ठेवावेत.
६) सकाळी गोगलगायी या ढगाखाली आश्रय घेतात. त्या गोळा करून मिठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
७) फळबागेतील उपद्रव टाळण्यासाठी दहा टक्के बोर्डपेस्ट बुंध्याला लावावी.
जैविक उपाय
गोगल गाईच्या नैसर्गिक शेतीचे संवर्धन करावे उदाहरणार्थ कोंबडी बदक
रासायनिक उपाय
दोन किलो मेल्ट प्रती एकर दहा लिटर पाणी अधिक दोन किलो गूळ अधिक 50 किलो गव्हाचे काड र्किंवा पोहे दहा ते बारा तास भिजत घालून शेतात छोटे छोटे ढीग करून ठेवल्यास प्रभावी नियंत्रण करता येते. अशाप्रकारे उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषि सहाय्यक यांनी केले.
या कार्यक्रसाठी श्री प्रसाद आरबुने, अभिजित जाधव शिवाजी आरबुने, सागर जाधव, विनायक आरबुने, सचिन रानमाळे, नागेश साठे आदी शेतकरी उपस्थित होते. आभार प्रसाद आरबुने यांनी मानले.