महाराष्ट्रकृषी व व्यापार

पालघर येथे सारथी आणि एम.सी.ई.डी. मार्फत महिलांसाठी मोफत चिकू -फळ प्रकिया प्रशिक्षण

कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण

 

 

पालघर प्रतिनिधी – : पालघर
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARATHI) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणी सहिबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास
योजने अंतर्गत कुणबी, मराठा कुणबी , कुणबी मराठा या समाजातील युवती व महिलांकरिता चिकू -फळ प्रक्रिया प्रशिक्षण या मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि .१९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे आयोजन केले आहे
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये चिकू पासून तयार केलेले विविध पदार्थ, चिकू पावडर, चिकू चिप्स, चिक हलवा, चिकू मोहनथाल ,चिकू लोणचे ,चिकू जाम चिकू मिल्कशेक ई. बाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन त्याचबरोबर पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि शासनाच्या विविध योजना, बँकिंग प्रकल्प अहवाल, उद्योगात लागणारे कागदपत्र, मार्केटिंग विविध उद्योग संधी, उद्योजकीय मानसिकता, उद्योजकीय गुणसंपदा ई. विषयावर रोज सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत तज्ञांमार्फत मार्गदर्शन होणार आहे. एक दिवस प्रत्यक्ष औद्योगीक भेट होणार असून पुढील एक वर्ष लाभार्थीना मदत तथा पाठपुरावा एम. सी. ई. डी. मार्फत मोफत होणार आहे.

सदरील प्रशिक्षणासाठी एकुण ३० महिलांची मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार असून असून इच्छुकांनी सदरील प्रोग्रामची सविस्तरपणे माहिती घेण्यासाठी आहे जिल्हा उद्योग केंद्र द्वारा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र १०३, प्रशासकीय इमारत अ , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोळगाव पालघर मो.८६६९०५४०७८, ९१७२३३८२७६ येथे दिनांक १७ सप्टेंबर पर्यंत संपर्क करावा असे आवाहन विभागीय अधिकारी सारथी आणि एम. सी. ई. डी. मुंबई यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!