महाराष्ट्र

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल येथे गणेश उत्सव अन् भक्तिमय वातावरणात गणपतीची आरती

 

 

 

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल ,भिलवडी येथे गणेश उत्सवाचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात गणपतीची आरती करण्यात आली.आरतीसाठी इ.१०वीच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या शाळेत सुद्धा या सणाचे महत्व ओळखून दरवर्षी आरती घेतली जाते.यासाठी इ.१ली ते ९वी विद्यार्थी उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!