शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास पुसणार्या शक्तीला वेळीच ठेचण्याची गरज : माजी प्राचार्य अशोक पाटोळे.
कोल्हापूरः अनिल पाटील
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आणि मराठी मनाची अस्मिता आहे अशा या छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आणि कर्तुत्वांचा इतिहास पुसून नवीन इतिहासाची मांडणी केली जाणारी शक्ती सध्या मान वर काढत आहे.अशा दळभद्री शक्तीला वेळीच ठेचण्याची आता वेळ आलेली आहे.त्यासाठी तरुणांनी तयार व्हावे असे आवाहन माजी प्राचार्य अशोक पाटोळे यांनी केले आहे.
कौलव (ता.राधानगरी) येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित सत्कार आणि स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.एस.पाटील हे होते.
प्रा.पाटोळे पुढे म्हणाले,ज्यांच्या विचाराने महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाची उभारणी झाली ज्या मरगळलेल्या तरुणांच्या मनगटात ताकद निर्माण झाली.अशा थोर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत गलिच्छ इतिहासाची मांडणी सध्या केली जात आहे.अफजल खान वधाच्या वेळी कृष्णाची भास्कर यांनी महाराजांच्या वर चालवलेल्या तलवारीचा इतिहास मालवण येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्यावर पहिल्यांदाच अशा प्रकारे ऊजागर केला जातो ही कोणत्या इतिहासाची मांडणी केली जात आहे,याचे उत्तर आम्ही मागत आहोत.म्हणून थोर पुरुषांचे फोटो लावून अभिवादन करण्याअगोदर खोटा आणि चुकीचा इतिहास पसरवणाऱ्या शक्तीचा बिमोड करण्याची वेळ आली आहे.
यावेळी भोगावती कारखान्याचे माजी संचालक सुनील कारंडे,सी.एस.पाटील यांचीही भाषणे झाली.या कार्यक्रमाला बंडोपंत यादव,प्रकाश सोनाळकर,दिनकर पाटील,चंद्रकांत पाटील,बाळासाहेब चरापले,बी.आर.चरापले,बाळासाहेब चरापले,कुंडलिक चरापले,सुशांत चरापले आदी मान्यवर उपस्थित होते.विविध स्पर्धक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
स्वागत-प्रास्ताविक अजिंक्य यादव याने केले. सूत्रसंचालन प्रा.सुदर्शन चरापले यांनी केले.