महाराष्ट्रराजकीय

काँग्रेस पक्षाचे नेते, उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी मिरज मतदारसंघ काढला पिंजून ; लोकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

सामान्य माणसाला न्याय देणारा माणूस; लोकांतून प्रतिक्रिया

 

 

मिरज : मिरज विधानसभा मतदारसंघातून आपण काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर निवडणूक लढणार असा निर्धार केलेलें काँग्रेस पक्षाचे नेते तथा उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब यांनी मिरज मतदारसंघातील सामान्य माणसांना प्रत्यक्ष भेटून मतदारसंघ पिंजून काढला आहे. ज्या गावांमध्ये लोकांच्या भेटीगाठी घेतील त्यावेळी लोकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामान्य माणसाला न्याय देणारा आपला हक्काचा माणूस उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब अशाही प्रतिक्रिया लोकांतून येत आहेत.

महाराष्ट्र राज्यात निवडणुकीचे पडघम वाजायला वेळ असला तरी या वेळीची वाट न पहाता सामान्य माणसाला आपलेसे करून जनता हेच आपलं दैवत मानणारे काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब यांनी मिरज मतदारसंघातील जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी मिरज येथे गारमेंट उभारले आहे. युवकांना उद्योग उभारले आहेत. सी आर सांगलीकर फौंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी केली आहे. यातून अनेक युवक युवती चांगल्या पदावर नोकरी करीत आहेत. हे पाहत असताना उद्योगपती सी आर सांगलीकर साहेबांनी कधीही दुजा भाव केला नाही. यासह अनेक कामांच्या जोरावर सी आर सांगलीकर यांना मिरज मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी मिरज मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याऩतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून सांगलीकर यांनी विविध गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते, यांना एकत्रित करून मिरज मतदारसंघ पिंजून काढला आहे. अनेक गावांमधून त्यांना लोकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या हक्काचा माणूस सांगलीकर साहेब जनतेचे प्रश्न तळमळीने सोडणारा माणूस असल्याच्या प्रतिक्रिया ही लोकांतून येत आहेत.

मिरज मतदार संघातील ग्रामीण भाग आणि शहरी भागातील मतदार बंधू भगिनी पर्यंत आम्ही पोहोचत आहे, आमच्या कार्याची माहिती देत आहे. राजकारणापेक्षा आपण समाजकारणात करणार आहे .जनता हेच आपले दैवत मानून सामान्य माणसापर्यंत कसे पोहोचता येईल, त्यांच्या अडीअडचणी समजून कशा घेता येईल, याकडे माझे लक्ष असणार आहे, मिरज मतदारसंघाचा काया पालट करण्याचा मानस ही माझा असणार आहे, असे काँग्रेसचे नेते तथा उद्योगपती सीआर सांगलीकर साहेब यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!