सांगली येथे डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर साहेब यांचे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने स्वागत
सांगली ;
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सांगली यांच्या वतीने, दि.०१/०९/२०२४ ते ०७/०९/२०२४ पर्यत ‘समता फोर्स कॅम्प’ पंचशील अकॅडमी, पलुस येथे कार्यक्रमाचे समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, आदरणीय डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी, कार्यक्रमाच्या ठिकाणी , आदरणीय डॉ. भिमराव आंबेडकर साहेब यांचे स्वागत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा पदाधिकार्यांने केले.
यावेळी,आदरणीय एस के भंडारे साहेब. राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर, समता सैनिक दल, आणि सुनीलजी लोखंडे साहेब, मुंबई प्रदेश सरचिटणीस, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, पलुस तालुका शैलेश दंडवते, जयकर काळे, विनायक हराळे, सचिन मोहिते या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ पुस्तक देऊन स्वागत करण्यात करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रूपेशजी तामगांवकर,विशाल कांबळे , रविंद्र लोंढे सर, जितेंद्र कोलप , रतन तोडकर, सुहास धोतरे, मुकेश धोतरे, सुजित कांबळे यांच्या बरोबर समता सैनिक दलाचे सैनिक, प्रशिक्षक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.