सातारा येथे कवी,ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांच्या प्रकाश पेरणी काव्यसंग्रहास राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार प्रदान
भिलवडी
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा आयोजित कै.भास्करराव ग.माने स्मृत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार भिलवडी ता.पलूस येथील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांच्या प्रकाश पेरणी या काव्यसंग्रहास प्रदान करण्यात आला.
सातारा येथील स्व.भाऊसाहेब सोमण सभागृहात ज्येष्ठ साहित्यि ,विचारवंत विश्वास दांडेकर यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध वक्ते प्रा.श्रीधर साळुंखे अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे.पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुभाष कवडे म्हणाले की,स्वानंद,रंजन आणि प्रबोधन हे लेखनाचे तीन हेतू मानले जातात.सामान्य वाचकांना पटकन समजेल अशा साध्या सुलभ भाषेत लिहावे असे मला वाटते.कारण असेच साहित्य वाचकांच्या हृदयाला भिडते व ते अव्वल ठरते.या पुरस्काराने मानसिक श्रीमंती वाढली आहे.झाडे,पाखरे आणि माती हे माझ्या लिखाणाचे विषय आहेत. प्रास्ताविक डॉ.राजेंद्र माने यांनी केले. स्वागत अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रविंद्र भारती यांनी केले. सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले.तर डॉ.राजेंद्र माने यांनी आभार मानले.यावेळी कादंबरीकार दि. बा.पाटील,ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे, डॉ.श्रीकांत पाटील,बाळासाहेब लबडे (गुहागर),आनंदा ननावरे,गौतम भोसले,शाशिभुषण जाधव सातारा जिल्ह्यातील साहित्यिक,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर,वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.