पन्हाळा तालुक्यातील कोङोली येथील मंङल अधिकारी अभिजीत पवार याला 15 हजार रूपयाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांचे काका यांनी घेतलेली शेतजमीन सात बारा पत्रकी नोंद करून सात बारा देण्याकरिता आरोपी रणजीत उर्फ आप्पा आनंदराव पाटील वय 48 ( खासगी इसम ) रा. कोङोली ता. पन्हाळा .जिल्हा. कोल्हापूर याने अभिजीत नारायण पवार पद मंङल अधिकारी वर्ग— 3 नेमणूक कोङोली मंङल अधिकारी कार्यालय ता. पन्हाळा रा. व्हीक्टर पॅलेस जवळ’ रूक्मिणी नगर” कोल्हापूर. यांच्यासाठी 20,000/ रूपये लाचेची मागणी केली. तसेच अभिजीत नारायण पवार यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती 15,000/-₹ लाचेची मागणी करून ती लाच रक्कम खासगी ईसम रणजीत पाटील यांच्याकङे देण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झालेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.नि.श्रीमती आसमा मुल्ला
सपोफो / प्रकाश भंडारे
पोहेकॉ / अजय चव्हाण
पो हेकॉ / सुधीर पाटील.
पोलीस निरीक्षक बापूसो साळूंकेयांच्या पथकाने केली.