शेत जमिनीचा फाळणी नकाशा देण्यासाठी 1000 रुपयाची लाच स्वीकारताना कागल येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा दप्तर बंद अधिकारी शिवराम कृष्णा कोरवी याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहात

दर्पण न्यूज कोल्हापूर.,,: अनिल पाटील
तकारदार हे त्यांचे शेतजमीनीची मोजनी करून घेणार होते म्हणून, त्यांनी त्यांचे शेतजमीनीचे शेजारील गट नंबरचा फाळणी नकाशा आवश्यक असल्याने, त्यांनी फाळणी नकाशा मिळवा म्हणून भूमिअभिलेख कार्यालय, कागल येथे रितसर अर्ज केला होता. केलेल्या अर्जाप्रमाणे तक्रारदार हे भूमि अभिलेख कार्यालय, कागल येथे काम करणारे शिवराम कृष्णा कोरवी, पद- शासकीय दप्तरबंद यांना भेटुन, त्यांचेकडे फाळणी नकाशाची मागणी केली, त्यावेळी शिवराम कौरवी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या अर्जाप्रमाणे शेतजमीनीचा फाळणी नकाशा देणेसाठी १०००/-रूपये दयावे लागतील असे म्हणून, तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली. म्हणून तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्यूरो. कोल्हापूर येथे तकार दिली होती.
अॅन्टी करपान ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तकार अर्जाची पडताळणी केली असता, पडताळणीमध्ये तक्रारदार यांचेकडे शिवराम कोरवी यांनी, केलेल्या अर्जातील गट क्रमांकाप्रमागे शेतजमीनीचा फाळणी नकाशा देणेसाठी १,०००/- रूपये दयावे लागतील, असे म्हणून तक्रारदार मांचेकडे (एकुण १,०००/- रूपयांची बेकायदेशिरपणे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर सापळा कारवाई केली असता, पंच साक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांचेकडुन आरोपी शिवराम कृष्णा कोरवी, पथ शासकीय दफ्तरबंद वर्ग-३, भूमि अभिलेख कार्यालय, कागल रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांनी १,०००/- रूपये लाच स्विकारलेने, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे सदरचायत आरोपी लोकसेवक शिवराम कृष्णा कोरवी, पद शासकीय दप्तरबंद वर्ग-३, भूमि अभिलेख कार्यालय, कागल रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांचेविरुध्द कागल पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे श्री. अर्जुन भोसते, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्ान ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार, वैष्णवी पाटील, पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र सानप पोलीस निरीक्षक, पो.हे. कों. संदिप काजीव, पो. ना. सचिन पाटील, पो. कों, कृष्णा पाटील, अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.



