महाराष्ट्र

कोल्हापूरनी मला भरभरुन दिल म्हणणाऱ्या कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या श्रीमती प्रतिभा करमरकर यांचे निधन

कोल्हापूरःअनिल पाटील

श्रीमती प्रतिभा करमरकर ह्यांचं मंगळवार दि. २८ मे ‘२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माहेर मुंबईचं असलं तरी त्या पूर्ण कोल्हापूरकर झाल्या.
त्यांनी कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. सांगली आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम सल्लागार समितीचं काम त्यांनी पाहिलं होत.
रोटरी, इनरव्हील, स्वयंसिद्धा, विरंगुळा अशा अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. दै. पुढारी, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता अशा अनेक. दैनिकांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं. त्याचं संकलित पुस्तक’बकुळीची फुले’ प्रसिद्ध झालं आहे.
पायाला फॅक्चर झाले असतानाही, त्यांनी व्हीलचेअर वरुन जाऊन ह्या लोकसभा निवडणुकीत मतदान करुन आपलं नागरिक कर्तव्य बजावलं.”मला कोल्हापूरने भरभरुन दिलं ही अंबाबाईचीच कृपा” असं त्या अगदी आवर्जून म्हणायच्या. प्रतिभाताईंच्या जाण्याने एक जागरूक नागरिक, संवेदनशील विचारवंत होत्या. त्यांनी मृत्युनंतर देहदान केलं.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!