साजणी येथील तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाङे याला 20 हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमीनीचा दस्त फेरफार मध्ये नोंद करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या वङीलांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनिवर काढलेल्या बँकेच्या कर्जाचा तारण दस्त फेरफार मध्ये नोंद करण्यासाठी साजणी आणी तिळवणी तालूका .हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाङे वय 41 रा. फ्लॅट नं 108 स्वप्नपूर्ती अपार्टमेंट “”पूईखङी” नवीन वाशी नाका जवळ कोल्हापूर. मूळगाव कांङगाव तालूका करवीर यांनी 20 हजार रूपयांची लाचेची मागणी करून ती रक्कम खासगी इसम साहील यासीन फरास वय 23 रा. साजणी. ता. हातकणंगले. जिल्हा. कोल्हापूर याला स्विकारण्यास सांगून ती लाच तक्रारदाराकङून स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले. या दोन आरोपीनां ताब्यात घेतले असून त्यांच्यावर रात्री उशिरा गून्हा दाखल करण्याचे काम सूरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संजीव बंबरगेकर”” पो.हे.काँ. विकास माने””सूनिल घोसाळकर” पो.काँ. रूपेश माने “”उदय पाटील”” सूरज अपराध यांनी केली.