कै बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तानाजी पोवार यांना समाजरत्न गौरव पुरस्कार प्रदान

दर्पण न्यूज बेडकिहाळ बेळगाव :-
कै बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव जिल्हा, 5 वे, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यांच्या वतीने सर्वसामान्यांचे रखवालदार, गोर गरीबांचे कैवारी तानाजी पोवार यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन आदर्श समाजरत्न गौरव पुरस्काराने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
गोर गरीबांचे नेते, वडार महाराष्ट्रचे सरचिटणीस, इचलकरंजी नगरीचे भाजपा पक्षप्रतोद तथा मा. उपनगराध्यक्ष, मजुर फेडरेशनचे कोल्हापूर संचालक, तानाजी पोवार गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वताला झोकुन घेऊन उल्लेखनीय कार्य करत आहेत. कोरोना व महापुर काळामध्ये लोकांमध्ये राहुन त्यांना आधार देण्याचे काम केले.अनेक गरजु लोकांना मदत करणे, शासकीय योजना गरजु लोकांपर्यंत पोहचवुन त्यांना लाभ मिळवुन देणे. अनेक सामाजिक उपक्रम गरजु लोकांच्यासाठी राबवणे, त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेली एकही व्यक्ती कधीच निराश होऊन जात नाही. अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठावंतपणे गोर गरीबांचे सर्व काम करुन देत असतात. इचलकरंजी तसेच परिसरामध्ये अनेक योजना राबविल्या आहेत. सर्वांशी स्नेहपूर्ण, बंधूभावाची वर्तवणुक जोपासुन सौजन्यशिल वर्तवणूकीने सर्वांची मने जिंकली. सहनशीलतेचा महामेरु, सेवाभावी वृत्तीचा महान समाज कार्यकर्ता, सहकारी तसेच ग्राहकवर्गाचा जीवणमित्र, जनसेवेचा आग्रदूत म्हणून त्यांना ओळखले जाते. शुन्यातून विश्व निर्माण करुन इचलकरंजी नगरपालिकेचे सलग तीन वेळा उपनगराध्यक्ष होन्याचा मान त्यांनी मिळवला. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ ता-निपाणी जि-बेळगाव यांच्या वतीने आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी इचलकरंजी महापालिका मा.अधिकारी जाधव सर, अन्वर मुल्ला पत्रकार, उद्योजक शब्बीर शेख, टेंपो चालक मालक संघटना अध्यक्ष यासीन मुल्ला आदी उपस्थित होते.