सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन जयंती

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या सुशीला कुंदे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली तयास मानव म्हणावे का ही कविता सादर केली यावेळी बोलताना म्हणाले सावित्रीबाईंनी त्याकाळी अंधार वाटेवर चालणाऱ्या अबला महिलांच्या मध्ये ज्ञानरूपी आणि शिक्षण रुपी शक्ती दिली आणि त्यांना प्रकाश वाट दाखवली अनंत हाल अपेष्टा सोसून त्यांनी मुलींसाठी ज्ञानदानाचे केलेले कार्य पिढ्या-पिढ्यासाठी आदर्शवत आहे आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत याचा पाया सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून निर्माण झालेला आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंनी मोलाची साथ दिली त्यामुळेच फुले दांपत्य इतिहासात अजरामर झालेले आहे सावित्रीबाईंचे विचार आणि कार्य आज सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे मनोगत सुभाष कवडे यांनी व्यक्त केले प्रारंभी ग्रंथपाल सौभाग्यवती मयुरी नलवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले यावेळी विद्यार्थी वाचक अमेय नलवडे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सौभाग्यवती सुशीला कुंदे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास महिला वाचक वाचनालयाचे विश्वस्त जीजी पाटील बाळासाहेब पाटील येळावकर वाचनालयाचे सर्व वाचक मोठ्या व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौभाग्यवती विद्या निकम यांनी आभार मानले