जयसिंगपूर येथील तलाठी स्वप्निल घाटगे याला 5 हजार रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांचे संबंधितांचे जयसिंगपूर येथील डवरी वसाहतीत असलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याबाबत केलेल्या अर्जाचे कामकाज हे तक्रारदार पाहत होते तरी सदरचा तक्रार अर्ज हा जयसिंगपूर येथील तलाठी आरोपी स्वप्निल वसंत घाटगेवय 39 पद तलाठी जयसिंगपूर रा. रूकङी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर यांचेकडे दिला होता. सदर क्षेत्रफळ दुरुस्ती करून सात बारा उतारा मिळणेकरिता आरोपी घाटगे यांनी तहसीलदार शिरोळ यांच्याकरिता तसेच तहसील कार्यालय येथील क्लार्क आलोसे शिवाजी नागनाथ इटलावार वय 32 पद महसूल साहाय्यक तहसिल कार्यालय शिरोळ मूळ गाव कूंङलवाङी जि. नांदेङ यांच्याकरिता व खाजगी टायपिस्ट यांच्याकरीता तक्रारदार यांच्याकडे 27,500/-₹ ची मागणी केली होती तसेच इटलावार यांनी तलाठी घाटगे यांनी सांगितलेप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे 5,000/-₹ ची मागणी केली आहे त्याप्रमाणे आरोपीं विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मूल्ला
सपोफो प्रकाश भंडारे,
पोहेकॉ अजय चव्हाण,
पोहेकॉ विकास माने,
पोना सुधीर पाटील,
पोना सचिन पाटील,
पोकॉ संदीप पवार,
चापोहेकॉ / सूरज अपराध, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.