मिरज येथे काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज अभिष्टचिंतन सोहळा आरोग्य शिबीर

मिरज : राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे मिरज विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक ८ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता मिरजेतील शनिवार पेठ येथील त्यांचे जनसंपर्क कार्यालय येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. तर सायंकाळी साडेपाच वाजता कोल्हापूर रोडवरील खतीब हॉल येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील काँग्रेससह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते व मिरज विधानसभा मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशालदादा पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमदादा सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, युवा नेते जितेश कदम, काँग्रेसचे मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. शनिवार पेठेतील सी. आर. सांगलीकर यांच्या संपर्क कार्यालयाजवळ सकाळी नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर होणार आहे. यावेळी नेत्र तपासणी शिबिरात सहभागी नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. उद्योगपती सी. आर. सांगलीकर हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजले नंतर कोल्हापूर रोडवरील खतीब हॉल येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली.