कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात ( सी.पी.आर) कुत्र्याचा वृद्धावर हल्ला

कोल्हापूरःअनिल पाटील
कोल्हापूरातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय ( सी.पी. आर) मध्ये अॅङमीट असलेल्या मूलगीला पाहाण्यासाठी जात असतानां अचानकपणे कूत्र्याने पाटीमागून येवून हल्ला केला. या हल्यात प्रकाश लक्ष्मण तोङकर वय 73 राहाणार .कोल्हापूर हे वूद्ध जखमी झालेत. ही घटना आज दूपारी तीन वाजता घङली.
प्रकाश तोङकर यांची मूलगी सी.पी. आर रूग्णालयात एक महीण्यापासून अॅङमीट होती.ती आहे का म्हणून तिला पाहाण्यासाठी जात असताना सी. पी. आर’मध्ये कर्मचारी निवासस्थानांसमोर कूत्र्याने पाटीमागून येवून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या ङाव्या पायाला जखम झाल्याने सध्या त्यांच्यावर सी.पी.आर रूग्णालयात उपचार सूरू आहेत.
सी. पी. आर रूग्णालयात भटक्या कूत्र्यांचे कळप असून या कळपांचा सी.पी.आर प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी रूग्णांच्यातून होत आहे