ताज्या घडामोडी
भिलवडी येथे बिनकामी नेत्यांचा सुळसुळाट? : लोकांची डोकेदुखी

भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे बिनकामी नेत्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे सामान्य लोकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे, अशी चर्चा लोकांमधून होतं आहे.
भिलवडी तसं विविध सामाजिक सलोखा अबाधित राखणार गाव. मात्र, गेल्या काही वर्षांत हा सामाजिक सलोखा घटत चालला असल्याचे दिसून येते आहे. का तर या बिनकामी नेत्यांमुळे अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांचे हाल होत आहे. भिलवडी गावत कोणत्याही पक्षाचा नेता आला की या बिनकामी नेत्यांना आवरायचे की विकास कामाच अन् गोरगरिबांच प्रश्न सोडवायचा हे मोठे जिकिरीचे झाले आहे. भिलवडी गावातील विविध शासकीय कार्यालयात या बिनकामी नेत्यांचा वावर असल्याने सामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे. या बिनकामी नेत्यांना वेळीच आवर घालावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.