क्रीडामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा सब ज्युनियर बॉईज फुटबॉल संघाचा जळगाव जिल्हा संघावर 5 गोलनी विजय

 

कोल्हापूर : अनिल पाटील

नांदेड येथे सुरू असलेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर बॉईज फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये के.एस.ए., कोल्हापूर जिल्हा सब ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघाचा 5-0 गोलफरकाने जळगाव संघावर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सामन्याच्या पूर्वार्धात सोहम माळी 12, वेदांत नलवडेने 27 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघास दोन शून्य गोल फरकाने आघाडीवर ठेवले. यानंतर सोहम माळीने 37 व्या तर पाठोपाठ जियाज इनामदारने 38 व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी 4 _ 0 अशी केली. शेवटी ज्यादा वेळेमध्ये अश्वेद भोसलेने ५०+१ व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी पाच शून्य अशी केली व हीच आघाडी अखेरपर्यंत शेवट राहील.
आघाडी फळीत विराज मोरे, समर्थ पोवार
मध्यम फळी सूर्यांश पाटील अनुज कातवरे व बचाव फळीत अद्वेत टिळके, विराज यादव, रायांश पिंगळे यांनी उत्तम रीतीने खेळ करून संघाचा विजय निश्चित करण्यात मोलाची भूमिका केली.
संघाचे ऑफिशियल्स गजानन मनगुतकर व योगेश सरनाईक यांनी उत्कृष्ट पद्धतीने संघास मार्गदर्शन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!