क्राईम
पाणी उपसा परवाणगी देण्यासाठी 5 हजाराची लाच घेताना चंदगङ लघूपाटबंधारे शाखेचा मोजणीदार सागर गुणवंत गोळे लाचलूचपतच्या जाळ्यात

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांनी ताम्रपणी नदीतून शेतीसाठी रीतसर पाणी उपसा परवाना मिळविण्यासाठी चंदगङ लघूपाटबंधारे विभागाकङे अर्ज केला होता. त्याप्रमाणे पाणी उपसा करण्यासाठी परवानगी देण्यासाठी तक्रारदाराकङे 8 हजार 500 रूपयांची लाचेची मागणी केली होती. त्यापॅकी आज 3 हजार रूपयाची लाच स्विकारली होती. तङजोङीअंती 5 हजार रूपयांची लाच स्विकारतानां चंदगङ लघूपाटबंधारे शाखा क्रमांक 1 चा मोजणीदार सागर गूणवंत गोळे वय(36) याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकङले.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नितीन कूंभार”” पो.स.ई संजीव बंबरगेकर””स.र्फौ प्रकाश भंङारे””पो.ना. सूधीर पाटील”” सचीन पाटील”” पो.काॅ. मयूर देसाई”” चालक. पो. हे काॅ विष्णू गूरव यांनी केली.