ताज्या घडामोडी
कृषी महोत्सवात 20 मार्चला कृतीसंगम कार्यशाळा
सांगली : कृषी विभागामार्फत सांगली जिल्हा कृषि महोत्सव 17 ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित केला आहे. कृषि महोत्सवामध्ये 20 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कृतीसंगम कार्यशाळा कल्पद्रुम ग्राउंड नेमीनाथनगर, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी दिली.