कृषी व व्यापार

कृषी महोत्सवात 19 मार्चला पाककला स्पर्धा

        सांगली  : कृषी विभागामार्फत सांगली जिल्हा कृषि महोत्सव  17 ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित केला आहे. कृषि महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने पाककला स्पर्धेचे 19 मार्च 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता कल्पद्रुम ग्राउंड नेमीनाथनगर, सांगली येथे आयोजन केले आहे. पाककला स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांना (शासकीय कार्यालयातील महिला/ शेतकरी महिला / इतर) पाककला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            पाककला स्पर्धकांची नोंद स्पर्धेच्या ठिकाणी घेण्यात येईल तसेच पौष्टिक तृणधान्य पासून तयार केलेले पदार्थच स्पर्धेसाठी पात्र ठरतील.  स्पर्धेच्या ठिकाणी तयार पदार्थ व त्याची रेसिपी सोबत घेऊन यावयाचे आहे. स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या स्पर्धाकांना प्रशस्तीपत्र पत्र देण्यात येईल, असेही श्री. सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!