
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):-सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा साळशिंगे रस्त्यावरील एका पोल्ट्री जवळ अचानक रात्री १०ते ११ सुमारास भीषण आग लागली.या आगीत संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे जळुन खाक झाले.ही आगा कशी लागली याची रात्री उशीरा माहिती मिळू शकली नाही,मात्र या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे,तर वेळेत आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आता असलेला गॅस सिलिंडर तातडीने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला,या आगी दरम्यान घटनास्थळी नागरीकांना तातडीने विटा नगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीसह घटनास्थळी धाव घेतली. व आगा आटोक्यात आणली,या आगीत एकजण जखमी झाला असल्याची माहिती घटनास्थळी नागरिकांनी दिली, सदर ( विजय असे या जखमी तरुणाचे नाव आहे. पूर्ण नाव समजू शकले नाही). या तरुणास विटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, सदर या संदर्भात ही आग कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही, या आगीत विजय नामक व्यक्ती जखमी झाला आहे, सदर या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली आहे, सदर आगीत जखमी झालेला तरुण हा कर्नाटकचा रहिवासी असल्याचे घटनास्थळी नागरिकांनी सांगितले, कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही मात्र अचानक लागलेल्या या भीषण आगीत घर जळून खाक झाले.