दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये एमडी या अमली पदार्थाची तरुण पिढीमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त होत होती. एमडी सारख्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी नशेच्या खाईत फेकल्या जात होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत एमडी ड्रग्सच्या बाबतीत गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार दिनांक 03/08/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विनोद इज्जपवार स्टाफ सह कळंब पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहीतगाराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की आरोपी नामे निखिल जाधव आणि अरविंद कांबळे हे कळंब येरमाळा रोड वरती कळंब शहरालगत पाझर तलावाजवळ येणार आहेत. आरोपी जवळ बेकायदेशीररित्या एमडी (मेफे ड्रोन) हे अमली पदार्थ असल्याबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्याने एन डी पी एस कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करून स्टाफ, पंच, फॉरेन्सिक व्हॅन सह कारवाई करिता पोलीस पार्टी रवाना झाली. गोपनीय माहितीनुसार दोन संशयित इसम रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून उभे असल्याचे आढळले दोघांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव निखिल जाधव आणि अरविंद कांबळे असे सांगितले. पंचां समक्ष संशयित इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एकूण 11.21 ग्रॅम पांढऱ्या रंगाचे स्फटिक स्वरूपातील पावडर 29 पारदर्शक प्लास्टिक पुड्यात मिळून आले. त्यानुसार पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 326 / 26 अन्वये एन डी पी एस कायदा कलम 8 (क), 22 (ब) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर माननीय पोलीस अधिकारी श्री संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि खटके स्था. गु. शा. धाराशिव, सपोनि मगर पो.स्टे. कळंब, पोहेकॉ / 397 राठोड, पोहेकॉ /327 जानराव, पोहेकॉ / 1431 गादेकर, पोहेकॉ / 1479 जाधवर, पोहेकॉ / 584 चौरे, पोना / 1611 जाधवर, पोना/1631 ढगारे, पोअं/1893 मुंगळे, पोहेकॉ / 84 शेख पोस्टे कळंब, पोहेकॉ / 1836 माळवे पोस्टे कळंब, पोअं/583 बोईनवाड, पोहेकॉ / 1248 आरब चापोहेकॉ / 1344 माने यांनी कामगिरी केली आहे.
