

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार) -: विटा हायस्कूल विटा व संजय भगवानराव पवार ज्युनिअर कॉलेज विटा मध्ये शनिवार दिनांक-१ ऑगस्ट २०२६ रोजी “व्यसनमुक्ती समाज म्हणजे सक्षम समाज” या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले व्याख्याते मा.डॉ.दीपक मुकादम ( मेडिकल ऑफिसर – निर्मल हॉस्पिटल, मिरज )
प्रास्ताविक – मा. प्राचार्य श्री. जाधव एच. एस. सर सरांनी आपल्या प्रास्ताविकेत डॉ. दीपक मुकादम यांची ओळख करून दिली त्याचबरोबर व्यसन मुक्ती ही आज काळाची गरज बनली आहे आजचा तरुण हा व्यसनाच्या विळख्यात सापडलेला आहे. मोबाईल असेल किंवा इतर काही व्यसन असतील तर या तरुण वर्गाला त्यातून बाहेर काढणं खूप गरजेचे आहे असे सूचित केले.
व्याख्याते -मा. डॉ. दीपक मुकादम सरांनी पी.पी.टी च्या साह्याने व्यसन म्हणजे काय? व्यसन तरुण वर्ग का करतो? त्याची कारणे सांगितली त्याचे परिणाम सांगितले.व्यसन केल्यानंतर मानवाचे शरीर कसं होतं कोणत्या व्यसनामुळे कोणते विकार होतात हे चित्रफिती च्या साह्याने मुलांना स्पष्ट केले.साधा एक सिगारेट जर ओढली तर तुमचा आयुष्य पाच मिनिटांनी कमी होतं म्हणजे आयुष्यात व्यसन करणारी लोक मृत्यूला किती जवळ करतात त्यांचा आयुष्य कसं संपतं…..हे त्यांनी सांगितलं व्यसन मुक्ती जर आपण केली तरच आपण एक सक्षम समाज,सुसंस्कृत समाज घडवू शकतो आणि व्यसनापासून आपण दूर राहिले पाहिजे याबद्दल अतिशय मौल्यवान असे मार्गदर्शन केले.
शेवटी विद्यार्थ्यांच्या कडून आम्ही व्यसन करणार नाही याबाबतची प्रतिज्ञा म्हणून घेतली.
आभार- श्री पाटील एस.बी.सर यांनी मानले सूत्रसंचालन- कु. भोरे एस. बी. मॅडम यांनी केले.
यावेळी विद्यालयातील इयत्ता ९वी, १० आणि ज्युनिअर कॉलेजमधीलइ. ११वी चे विद्यार्थी तसेच माध्यमिकचे शिक्षक व उच्च माध्यमिक चे शिक्षक उपस्थित होते.
