
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार) -:प्रजिमा क्र. ३४ शिरगाव कवठे ते कवठे एकंद गावातून उपळावी या मार्गाचे युद्धपातळीवर त्वरीत दुरुस्ती काम करावे कारण हा रस्ता नागाव कवठेचे पुढे एका विहीर जवळ खचला आहे .तेथे सदोष मनुष्य हानी होऊ शकते तर कवठे एकंद मध्ये अनेक ठिकाणी या मार्गावर अपघात होवून शकतात, नागाव भागातही हिच स्थिती आहे, प्रजिमा क्र. ९९ कवठे एकंद जुनी चावडी ते चिंचणी हा मार्ग पुर्णपणे खराब झाला आहे. या दोन्ही प्रजिमा मार्गाचे त्वरीत दुरुस्ती काम एक आठवड्यात करावे, अन्यथा याचं प्रजिमा क्र.३४ या मार्गावरील कवठे एकंद ग्राम सचिवालय समोर १३/ऑगस्ट/२०२६ वेळ सकाळी दहा पासून कवठे एकंद ग्रामस्थांच्या सोबत बेमुदत आमरण उपोषणास बसणार…! असे निवेदन
-शशिकांत डांगे.
शेतकरी चळवळीतील आंदोलक कवठे एकंद यांनी दिले आहे.
