दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: मयत नामे-पांडुरंग मारुती सातपुते, वय 46 वर्षे, रा.पिंपरी बे ता जि. धाराशिव यांनी दि.31.07.2026 रोजी 20.00 वा. सु. ते दि.01.08.2026 रोजी 06.00 वा. सु. शाहुराज करवार यांचे शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-योगेश महादेव गरड, रा. पिंपरी बे. ता. जि. धाराशिव यांनी मयत पांडुरंग यांना शेत विक्री करुन सर्व पैसे घेवुन शेतीचा ताबा न देता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन तुझी काय लायकी आहे असे वारंवार म्हणत असल्याने त्याचे त्रासाला कंटाळुन मयत पांडुरंग यानी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनिता पांडुरंग सातपुते, वय 40 वर्षे, रा. पिंपरी बे. ता. जि. धाराशिव यांनी दि.01.08.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 329(3), 351(1), 351(2), 352 सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3(1)(आर)(एस), 3(1)(एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
