
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):–सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा परिसरात हजारो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखावा मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ उत्साहात झाला.
यावेळी आमदार सुहास बाबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवदत्त राजोपाध्ये, मंडळाचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अमोल बाबर. नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे. यांच्यासह विविध मान्यवर आणि मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच श्री गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी विट्याचा राजा गणेशोत्सवाचे १६ वे वर्ष असून आकर्षक सजावट भव्य देखावा आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी आपले विचार व्यक्त केले.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी हेच दरवर्षी विटयाच्या राजाची मूर्ती तयार करतात. लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली ही मूर्ती भाविकांच्या विशेष आकर्षण ठरते. त्याचबरोबर दरवर्षी ख्यातनामा कलादिग्दर्शक योगेश शेळके यांच्या संकल्पनेतून विट्याच्या राजासाठी आकर्षक आणि भव्य सेट उभारला जातो. यंदाची भव्य सेटच्या मंडप उभारणीच्या कामाचे पूजन मंडळाचे कार्यकर्ते डॉक्टर प्रसाद लिपारे यांनी सपत्नीक केले, यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभिजीत पवार तथा पप्पू दाजी कदम, सचिव संजय धडस, सौरभ रोकडे. नगरसेवक विनोद गुळवणी. कृष्णात गायकवाड. संजय भिंगारदेवे, वैभव म्हेत्रे. निशांत तारळेकर. अमर शितोळे, सुरेश पाटील. जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शीतल बाबर.प्रा, सोनिया बाबर. नगरसेविका रूपाली मेटकरी, लीला भिंगारदेवे, अर्पणा पाटील, वनिता शितोळे, रसिका सपकाळ, उज्वला पाटील, तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, महेश भिंगारदेवे, अनंत माळी, हेमंत रोकडे श्रीकांत रिसवडे, तुषार रोकडे. सुरेश पाटील बाबुराव चव्हाण. विनय भंडारे सौरभ शेळके. निखिल भिंगारदेवे, यांच्यासह भारत पवार किरण पाटील. प्रकाश सपकाळ, रणजीत पाटील सारंग म्हेत्रे, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
