दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-रमाकांत उत्तम डोलारे, प्रशांत उत्तम डोलारे, शशीकांत उत्तम डोलारे, आदित्य प्रशांत डोलारे, विनोद पांडुरंग पौळ, सोहम रमाकांत डोलारे, अनिकेत प्रशांत डोलारे, सुशला उत्तम डोलारे, सर्व रा. आळणी ता. जि. धाराशिव यांनी दि.28.07.2026 रोजी 20.30 वा. सु. कुंभार गल्ली आळणी येथे फिर्यादी नामे-गणेश अविनाश कांबळे, वय 22 वर्षे, रा. आळणी ता. जि. धाराशिव यांना व इतर नातेवाईक यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, दगड, लोखंडी सळई,काठी व कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गणेश कांबळे यांनी दि.31.07.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 189(2), 191(2), 190, 352, 351(2) (3) सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
