दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-नैतिक विसाल कांबळे, विशाल आडगळे, शुभम भिसे, पवन जिव पौळ,कुंभार जिवन पौळ, गणेश अविनाश कांबळे, रोहन दिपक कदम, अतिश जगन्नाथ पौळ सर्व रा. आळणी ता. जि. धाराशिव यांनी दि.28.07.2026 रोजी 19.30 वा. सु यशोदा बॅकेसमोर आळणी चौक येथे व 20.30 वा. सु. आळणी येथे फिर्यादी नामे-सोहम रमाकांत डोलारे, वय 18वर्षे, रा. कुंभारगल्ली आळणी ता. जि. धाराशिव यांना व त्यांचे वडील रमाकांत डोलारे व आजी सुशीला डोलारे यांना नमुद आरोपींनी बहिणीला बोलण्याचा राग धरुन सदर कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हॉकी स्टीक, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. गाडीचा काच फोडून नुकसान केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोहम डोलारे यांनी दि.30.07.2026 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1), 189(2), 191(2), 190, 352, 351(2) (3), 324(4) सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
