दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-: सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज, तसेच वीर शिवा काशिद, व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करत , स्वर्गीय मोहन काळे यांचा विचारांचा वारसा जपत समाज हितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करणे हेच माझ्या वडिलांच्या विचाराची धारा जपत मी सतत कार्यरत राहील असे प्रतिपादन विट्यातील नाभिक समाजाचे तरुण कार्यकर्ते व विटा शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रात कायम अग्रेसर असणारे श्री संजय मोहन काळे यांचे बंधू विजय मोहन काळे यांनी आपले विचार व्यक्त केले. विजय काळे यांनी आपला वाढदिवस यावर्षी आपल्या वडिलांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच वीर शिवा काशिद यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, माजी आमदार ॲड सदाशिवराव( भाऊ) पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव (दादा) पाटील यांचे ते कट्टर समर्थक म्हणून विटा शहरात विजय काळे यांची ओळख निर्माण झाली आहे, विजय काळे यांचे वडील मोहन काळे हे सुद्धा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे केस कापने हे त्यांच्या सलून दुकानात मोफत सुविधा निर्माण करत होते, वडिलांची विचारधारा आज संजय काळे व मोहन काळे जपत असतात, समाजामध्ये काम करत असताना सर्वांना बरोबरीने घेऊन विचारधारा जपणे हीच आम्हाला वडिलांचे शिकवण असल्याचे विजय काळे व संजय काळे यांनी सांगितले, विजय काळे यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करत त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत आज आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत, विजय काळे यांना सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत. माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील. माजी नगराध्यक्ष ॲड वैभव दादा पाटील,सह जेष्ठ पत्रकार शिराज शिकलगार, सामजिक कार्यकर्ते शिवाजीराव शिंदे, रायबा शिंदे ( विटा). राजकीय व सामाजिक नेते राजू जाधव, समस्त मित्र मंडळी ( हणमंत नगर विटा). व विटा शहरातील नाभिक समाज बांधव, जितेंद्र काळे, जितेंद्र सुर्यवंशी, समस्त काळे परिवार,विटा.
