
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने). :-
आज दि. 04/08/2026 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नळदुर्ग हद्दीतील मौजे पाटील तांडा खुदावाडी ता. तुळजापुर येथे अवैध गा.ह.भ. व दारु निर्मीतीचे ठिकाणी मास रेड करणे कामी मा. मनोहर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तुळजापुर, पो.स्टे. नळदुर्गचे सपोनि सोळुंके, सपोनि कांगुने, पोउपनि सय्यद, पोहेकॉ / 1350 हजारे, पोहेकॉ 1432 मिटके, पोहेकॉ 1338 राठोड, पोना / 1367 कुंभार, पोकॉ/888 शेख, पोकॉ 972 वाघमारे, पोकॉ 995 कुंभार, पोकों 138 कांबळे, पोकॉ 1818 माने, पोकॉ 90 शिंदे, मपोना / 1653 सुर्यवंशी, मपोकॉ/1656 तांबोळी सर्व पो.स्टे. नळदुर्ग तसेच पो.स्टे. तामलवाडी येथील पोउपनि नांगरे, सपोफौ/966 सरगुले, पो.स्टे. तुळजापुर येथील पोउपनि भुतेकर, सपोफौ / 1884 सांवत, पोकॉ/1737 कोळी, पोकॉ 1858 पांचाळ, पोकॉ 1812 आंभुरे, पोकॉ 570 माळी, मपोना / 1650 राठोड, मपोकॉ/830 गटकुळ व मुख्यालय धाराशिव येथील एक आर.सी.पी. प्लाटुन व तसेच राज्य उत्पादन शुल्क धाराशिव यांचे अधिकारी व अंमलदार यांचे संयुक्त कार्यवाही दरम्यान पाटील तांडा खुदावाडी येथे जावुन अवैध गा.ह. भ. व दारु निर्मीत करणारे इसमांवर मास रेड करण्यात आली. सदर कार्यवाही दरम्यान 1. विमल नादेव चव्हाण, वय 55 वर्षे, 2. गुरुनाथ नुरा राठोड़, वय 60 वर्षे, 3. हिरा राम पवार, वय 55 वर्षे, 4. नागाबाई विलास चव्हाण, वय 41 वर्षे, 5. सुरेश धनु पवार, वय 40 वर्षे, 6. विकास शिवाजी राठोड, वय 35 वर्षे, 7. हरीष टिकाराम जाधव, वय 45 वर्षे, 8. सचिन सुभाष पवार, वय 24 वर्षे, 9. लखन हिरा चव्हान, वय 30 वर्षे, 10. अमोल देविदास राठोड, वय 52 वर्षे, 11. सपना संतोष पवार, वय 30 वर्ष, 12. शंकर नुरा राठोड, वय 42 वर्ष, 13. अनुसया अमृत पवार, वय 51 वर्ष, 14. उषाताई श्रीमंत पवार, वय 45 वर्षे, सर्व राहणार पाटील तांडा खुदावाडी, ता. तुळजापुर, जि. धाराशिव असे एकुण 14 आरोपीतांचे कब्जात व ताब्यात वेगवेगळ्या बॅरलमध्ये बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे गुळमिश्रीत रसायन एकुण 12,500 ली. व गावठी हातभट्टी दारु 700 ली. असा एकुण 5,07,500/-रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने पाटील तांडा येथील 14 आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (फ), 65 (ई), 81, 83 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली.
