दर्पण न्यूज मिरज/सांगली–:सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी पदभार स्वीकारला. यानिमित्त वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली तसेच वंचित बहुजन आघाडी सांगली यांच्या शिष्टमंडळातर्फे स्वागत व नागरी सत्कार करण्यात आला.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातून प्रशासनात पारदर्शकता, जनहिताचे निर्णय आणि सामाजिक न्यायाची नवी दिशा मिळेल, अशा आशावादी भावनेने हा सत्कार सोहळा पार पडला. सांगली जिल्ह्यातील जनतेच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघावा, वंचित, श्रमिक, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विश्वासाने अपेक्षा व्यक्त केल्या.
या प्रसंगी
प्रशांत वाघमारे (पश्चिम महाराष्ट्र महासचिव),
मधुकर शेस्वरे (वंचित बहुजन आघाडी नेते),
संजय भूपाल कांबळे (जिल्हा संपर्कप्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन),
मोहन साबळे (सांमिकु महापालिका क्षेत्र अध्यक्ष),
प्रज्ञाताई साबळे,
मनोज सनदे (सांगली शहर महासचिव),
हिरामण भगत (कोषाध्यक्ष),
प्रकाश गायकवाड
तसेच दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.