भिलवडी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भगवान पालवे यांच्या अवाहनाने भारत सरकार यांच्या फिट इंडिया या संकल्पनेतून भिलवडी मध्ये *संडे ऑन सायकल* रॅलीचे आयोजन.
उत्तम आरोग्य व चांगल्या पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पोलीस दल, जायंट्स ग्रुप व भिलवडी सायकल क्लब यांचेमार्फत या रॅलीचे नियोजन करण्यात आले.
या रॅलीची सुरुवात भिलवडी पोलीस ठाण्यापासून झाली, निसर्गाचा आनंद घेत औदुंबर अंकलखोप पेट्रोल पंप परिसरातून सर्व सायकल स्वारांनी फेरफटका मारला. यावेळी उद्योजक श्री गिरीश चितळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भगवान पालवे, पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास पावशे, भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तसेच सुबोध वाळवेकर, महावीर चौगुले, बाहुबली चौगुले, डॉक्टर शशिकांत पाटील, शितल चौगुले, नागनाथ वसगडेकर, राजेंद्र कुंभार, संकेत चौगुले, संभाजी महिंद सनी गायकवाड, गणेश आंबी या सायकल स्वारांनी सहभाग नोंदवला.