दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे- सचिन श्रीमंत चव्हाण, अमोल श्रीमंत चव्हाण,(कारचालक) रा. गुंजेवाउी पोस्ट अंबेजवळगे ता. जि. धाराशिव, राजश्री चंद्रकांत पवार, रा.प्रकाश नगर लातुर,स्वामी सचिन चव्हाण, नमिता अमोल चव्हाण, महानंदाश्रीमंत चव्हाण, रा.गुंजेवाडी पोस्अ अंबेजवळगे ता. जि. धाराशिव, सुनिता कृष्णा जाधव,रा. प्रकाश नगर लातुर यांनी दि.03.04.2026 रोजी 17.30 वा. सु. लहुजी शक्ती सेना चौक येरमाळा येथुन पुढे येडेश्वरी देवी यात्रा निमीत्त बनवलेले तात्पुरते बसस्थानक समोर फिर्यादी नामे-नरसिंग राजेंद्र गायकवाड, वय 26 वर्षे, ने पोलीस मुख्यालय धाराशिव हे व सोबत स्टाफ सह शासकीय कर्तव्य पार पाडत असताना ट्राफीक मोकळी करत असताना नमुद गाडी चालक अमोल चव्हाण यांनी त्याचे ताब्यातील वाहन हे फिर्यादीने दिलेल्या इशऱ्याकडे दुर्लक्ष करुन वाहतुक कोंडी निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेला आडथळा निर्माण केला तसेच नमुद गाडी फिर्यदीचे अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. इतर नमुद आरोपींनी जाणीपुर्वक व हेतुपुरस्पर शासकीय कामापासुन परावृत्त करण्याचे उद्देशाने आरेरावी करुन धक्काबुक्की करुन धमकी व शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नरसिंगा गायकवाड यांनी दि.04.04.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम 132,115(2),352,351(2),(3),189(2) सह 132, 179(1),मोवाका सह 110,117 मु.पो.का. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.