दर्पण न्यूज पलूस :-
दुधोंडी गावातील दलित समाज्यासाठी असणारा पाण्याचा आड खुला करण्यात यावा या मागणीसाठी गुरुवार दि. 09 जुलै रोजी दुधोंडी येथे आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी बौद्ध व मातंग समाज्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हरिजन आड खुला करावा ही आग्रही मागणी दलित समाज्याकडून करण्यात आली. यावेळी दुधोंडी गावात बहुजन समाज ऐकत्र झाला आहे. येणाऱ्या काळात दलित विरोधी भूमिका घेतल्यास आंबेडकरी समाज याचे उत्तर निवडणुकीत देणार असून दुधोंडी गावात येणारा सरपंच आंबेडकरी समाज ठरवणार असल्याचे आरपीआयचे विशाल तिरमारे यांनी जाहीर केले.