ताज्या घडामोडी

औंदुबर येथे महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्माकुमारींज भिलवडी सेवाकेंद्राकडून भव्य १००८ नारळाच्या शिवलिंगाचे दर्शनाचे आयोजन

दर्पण न्यूज भिलवडी :- महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर औदुंबर येथे प्रथमच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र भिलवडी यांच्या सहयोगातून भाविकांसाठी एक विशेष आध्यात्मिक पर्वणी आयोजित केली आहे. औदुंबर या ठिकाणी भव्य अशा १००८ नारळापासून बनवलेले शिवलिंगाचे दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे. त्याबरोबरच गहन अध्यात्मिक ज्ञान स्पष्ट करणारे चित्र प्रदर्शन ही सर्वांना पाहता येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे यावेळी जागरण अंतर्मनाचे हा अलौकिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे यासाठी वक्त्या सुनिता बहेनजी उपस्थित राहणार आहेत.

शिवालिंग दर्शनासाठी शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 व रविवारी दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत खुले राहील ईश्वर प्रेमी सर्व बंधू-भगिनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा

भिलवडी सेवाकेंद्राच्या संचालिका मीरा बहेनजी यांनी सांगितले की, “शिवरात्री म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा सण. या शिवलिंग दर्शनाच्या माध्यमातून मानवातील ईश्वरीय गुणांची जागृती व्हावी हाच आमचा उद्देश आहे.” या आध्यात्मिक दर्शनाचा लाभ सर्व नागरिकांनी, तरुण पिढीने आणि महिलांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन सेवाकेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!