

दर्पण न्यूज निपाणी :- निपाणी येथे 1 मार्च रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद होणार आहे.
निपाणी येथील 1 मार्च रोजी होणाऱ्या धम परिषदेचे प्रमुख व्यक्ते जगदीश मोहोळ ..सुधाकर माने ..
..भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी निपाणी मध्ये भव्य धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध व्याख्याते जग बदलणारा बाप माणूस या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उत्तर कर्नाटक भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु मनोहर मोरे हे असणार आहेत.
शैक्षणिक सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा परिषदेमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. निपाणी मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आठ वेळा येऊन मार्गदर्शन केले असल्याने निपाणीला आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर. दुसरे अध्यक्ष यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर. तिसरे अध्यक्ष मीराताई आंबेडकर. चौथे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी निपाणी मध्ये धम्माचा प्रचार व प्रसार केला असल्याने निपाणीला धम्मभूमी म्हणून ओळखले जाते. या ऐतिहासिक शहरात धम्मपरिषद होत असल्याने ही निपाणी वासी यांसाठी गौरवाची बाब आहे. धम्मपरिषद यशस्वी करण्याचे आवाहन धम्म परिषद व शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी केले.
. या बैठकीला प्रा. डॉ. रवींद्र दिवाकर डॉ.विक्रम शिंगाडे डीएसएस संदीप माने ऑल इंडिया पॅथर सेना शहराध्यक्ष कबीर वराळे, संतोष मेस्त्री,सुशील कांबळे,उदय वंटे, जनार्दन मोहिते, पिंटू माने, जयसिंग कांबळे, नवनाथ शिंगे उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत प्रा. अजित कांबळे भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुकाध्यक्ष यानी केले. आभार दिलीप कांबळे यांनी मानले.



