अंकलखोप जि प गटातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप गडदे विजयी ; आमणापूर प स गणातून काँग्रेस तर अंकलखोप पं स गणातून भाजप उमेदवार विजयी


दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस :- अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप गडदे विजयी झाले आहेत. अंकलखोप पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आनंदराव कुराडे विजयी झाले आहेत. आमणापूर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव सगळे विजयी झाले आहेत.
अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप गडदे यांना 11802 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील यांना 11127 मते मिळाली आहेत.
अंकलखोप पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार जितेश बनसोडे यांना 5093 मते मिळाली आहेत. आनंदराव कुराडे यांना 6012 मते मिळाली आहेत. आमणापूर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव उगळे यांना 6958 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदय साळुंखे यांना 4926 मते मिळाली आहेत. या पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव उगळे विजयी तर भाजपाचे उमेदवार आनंदराव कुराडे विजयी झाले आहेत.




